Live Energy
Search documents
Live Energy in Hindustani Classical Music | Shadaj Pancham | TEDxVIT
TEDx Talks· 2026-04-16 15:21
मगाशी तुमच्या कानावर पडलेले सूर तांत्रिक दृष्ट्या अगदी अचूक होते स्वरांचा चड उतार लईचा खेळ सगळंच अगदी गणितासारखं पक्क होतं पण आपण यात आता एक छोटासा बदल करूया आ आता मला सांगा कोणत्या सुरांनी तुमच्या मनाचा ठाव घेतला. आधी ऐकलेला तो एआय जनरेटेड आवाज की आता अनुभवलेला हा जिवंत श्वास जसा प्रयोगशाळेत रसायनांपासून तयार केलेल्या कृत्रिम सुगंधामध्ये आणि पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या अस्सल गंधामध्ये फरक असतो तोच इथे होता. अगदी खर आहे कारण संगीत हे केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नसते ते जगायचे असते एका आईची अंगाई आठवा बर ...